पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून रेपणपल्ली येथे “भव्य कृषी मेळाव्याचे”आयोजन .

71

 

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सो. पोलीस अधीक्षक गडचिरोली .,मा.श्री.यतीश देशमुख सो . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली,मा. श्री. कुमार चिंता सो.(अपर पो. अधीक्षक  प्रशासन ) ,गडचिरोली, मा. श्री. एम. रमेश सो. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी,मा.श्री. दसुरकर सो.उपविभागीय पोलिस अधिकारी जीमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली उप पोस्ट. रेपणपल्ली येथे आज दिनांक 25/06/2024 रोजी *”भव्य कृषी मेळाव्याचे”*  आयोजन करण्यात आले.

सदर भव्य कृषी मेळाव्याचे *अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी दसुरकर साहेब जीमलगट्टा सा.*

प्रमुख पाहुणे कमलापूर सरपंच श्रीनिवास पेंदाम मा. ग्रामसेविका काळे मॅडम. व पोस्टे हद्दीतील वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग तसेच पोलीस पाटील पाहुण्यांचे उपस्थितीत *भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके* यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कृषी मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

सदर कृषी मेळाव्याचे *सूत्रसंचालन मपोउपनि. प्रियंका मेश्राम,* व *प्रस्ताविक पोउपनि. राठोड सा.* यांनी केले कृषी मेळाव्याचे प्रमुख अतिथी यांनी आप आपल्या विभागा संदर्भात माहिती तसेच शेती विषयक माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दसुरकर साहेब जीमेलगट्टा यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र बद्दल माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले. तसेच हद्दीतील शेतकरी यांना सदर कृषी मेळाव्याला उपस्थित शेतकरी व नागरिकाना खालील शेतीला उपयोगी साहित्य वाटप  करण्यात आले.

*1)युरिया खत-180 बॅग*

*2) चार्जिंग फवारणी पंप- 22 नग*

*3) MTU -1010 25 किलोचे एक बॅग एकूण बॅग=30.*

*4) प्लास्टिक टोपली – 80*

*5) फावडे – 80 नग*

*6) ताडपत्री 12×16 एकूण= 50 नग*

*7) छत्री 75 नग.*

*8) मक्का बी एक किलो बॅग एकूण= 50 बॅग.*

*9) टोपलं 100 नग.*

*सर्व साहित्य फ्री मध्ये वाटप करण्यात आले.*

 

तसेच सदर कृषी मेळाव्यामध्ये पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हद्दीतील नागरिकांना खालील लाभ देण्यात आले.

1) सातबारा प्रमाणपत्र – 46

2) ईश्र कार्ड- 39

4) अधिवास दाखला -05

5) आयुष्यमान कार्ड – 39

6) पॅन कार्ड – 09

7) पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना= 52

पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना= 40

योजनाचा लाभ देण्यात आला.

*पोउपनि. राठोड सा.* यांनी सर्व मान्यवरांचे तसेच हददीतील सर्व शेतकरी व नागरिक यांना समारोप मार्गदर्शनमध्ये लोकांना कृषि योजनांचा लाभ घेण्याचे तसेच नक्षवादयाचे भूलथापांना बळी न पडण्याचे ,व्यसनाधीनता, जादूटोणा, भुतप्रेत या अंधश्रद्धा पासून लांब राहण्याचे व अशा गोष्टींना विरोध करण्याचे आवाहन केले .

सदर भव्य कृषी मेळाव्यामध्ये  *उप पोस्टे. रेपणपल्ली* हद्दीतील एकूण 450 ते 500 च्या संख्येने* शेतकरी व नागरिक उपस्थित होते उपस्थित सर्वाना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

सदर कृषी मेळावा यशस्वी होण्यासाठी पोलीस उप. स्टेशन रेपणपल्ली येथील जिल्हा पोलीस चे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने कृषी मेळावा शांततेत पार पडला.