कमलापूर परिसरातील समस्या तात्काळ सोडवा उपसरपंच यांचे मंत्री महोदयांना निवेदन

67

कमलापूर परिसरातील समस्या तात्काळ सोडवा उपसरपंच यांचे मंत्री महोदयांना निवेदन.

कमलापूर-कमलापुर हे गाव अति संवेदनशील व दुर्गम भाग असून या भागाचा विकास मात्र कुठला आहे सध्या कमलापूर हे गाव हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध होत आहे अशातच या भागात विकास नसल्याने बाहेरील पर्यटकांना फार त्रास सहन करावा लागत आहे तसेच परिसरातील नागरिकांना विकासाच्या प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही कमलापूर हे गाव अहेरी तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करण्यात यावे ह्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सतत संघर्ष सुरू असून अद्यापही याबाबत शासन प्रशासन गांभीर्य नाही कमलापूर परिसरात वीस ते पंचवीस गावे येत असून या परिसरात विजेचा लपंडाव कायम असतो यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच विद्युत वर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसाय धारकांना याचा फटका बसत असून शेतकरी बांधवांना देखील दुबार शेती पिकवणे किंवा भाजीपाला असो लागवड करणे कठीण परिस्थिती सामना करावा लागत आहे शिवाय विद्यार्थ्यांना देखील विद्युत अभावी अभ्यास करणे शक्य नाही यामुळे शासनाला अनेक वर्षापासून कमलापूर येथे 33 केव्ही विद्युत उपकेंद्र व्हावे यासाठी निवेदने व पाठपुरावा केले असता या ठिकाणी 33 केवी विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले तसेच वनविभागाने जागाही उपलब्ध करून दिले परंतु सदर विद्युत उपकेंद्र उभारण्याचे काम रखडलेले आहे शासनाचे दिरंगाई होत आहे याशिवाय कमलापूर येथे महसूल मंडळ कार्यालय देखील मंजूर करण्यात आले असून तलाठी साझा कार्यालयाच्या सुद्धा विस्तार करण्यात आला परंतु अद्यापही महसूल भवन बांधण्यात आले नाही रेपनपल्ली वाया कमलापूर छल्लेवाडा राजाराम गोलाकरजी या मार्गाचे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून डांबर उघडलेला आहे अनेक खड्डे पडले आहे यामुळे सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे शिवाय रेपनपल्ली कमलापूर मध्यंतरी असलेल्या नाल्यावरील फुलाची उंची कमी असून सदर फुल निर्लेखित झालेले आहे यामुळे या पुलाची निर्लेखन करून नवीन फुलाचे बांधकाम करण्यात यावे यासह अन्या परिसरातील समस्या घेऊन कमलापूरचे उपसरपंच सचिन आर ओलिटीवर याने श्री माननीय धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा करण्यात आले सदर समस्या शासन स्तरावरून सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे