Home Breaking News *जात वैधता प्रमाणपत्रबाबत विद्यार्थ्यांना सूचना*

*जात वैधता प्रमाणपत्रबाबत विद्यार्थ्यांना सूचना*

114

*जात वैधता प्रमाणपत्रबाबत विद्यार्थ्यांना सूचना*

गडचिरोली, (जिमाका) दि.31 : सन 2024-2025 या सत्रात राखीव प्रवर्गातुन व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी 5 जूलै 2024 पर्यंत समितीकडे अर्ज सादर केले आहे अशा विद्यार्थ्याचे (त्रुटीचे प्रकरणे वगळून) जात वैधता प्रमाणपत्र तयार झाले असून, त्यांच्या ते त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आले आहे.

मात्र ज्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, असे प्रकरणे त्रुटीमध्ये असून प्रस्तावातील त्रृटी पुर्तता न झाल्याने व जात व अधिवासाचे सक्षम पुरावे सादर न केल्याने असे प्रस्ताव समितीच्या निर्णयार्थ प्रलंबीत आहेत. अशा सर्व अर्जदारांनी मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यासंह दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी त्रुटींची पुर्तता करण्याकरीता समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

तसेच सन 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून व्यावसायीक अभ्याक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह विहीत नमून्याती अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त़ देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!