Home Breaking News 19 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

19 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

79

19 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 

गडचिरोली,(जिमाका)दि.05:महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकुण त्यांचे निवेदन स्विकारण्यात येईल. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26, 27 कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात निशुल्क प्राप्त होईल. दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयातील सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पीडित महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे. याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!