Home Breaking News *जय माँ काली कल्चर स्पोर्ट असोसिएशन देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस...

*जय माँ काली कल्चर स्पोर्ट असोसिएशन देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न .!*

192

*जय माँ काली कल्चर स्पोर्ट असोसिएशन देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न .!*

 

 

*माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून (31111/- रुपये) विशेष पारितोषिक.!!*

 

*मूलचेरा:-* तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथे जय माँ काली कल्चर असोसिएशन तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.

या फुटबॉल स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला होता.

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवा वर्गाला क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी पारितोषिके देत असतात व त्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

जय माँ काली कल्चर असोसिएशन देवनगर येथील भव्य फुटबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या गणेशनगर संघाला माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून विशेष पारितोषिक म्हणून शिल्ड व (31111/- रुपये) देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजेत्या आनंदग्राम संघाला शिल्ड व (22222/-रुपये) श्री.गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) व सौ.बिनाताई निशिकांत बाला यांच्या कडून देण्यात आले,तर शिल्ड व (10000/-रुपये) तृतीय विजेत्या भावणीपुर संघाला तसेच शिल्ड व (5000/-रुपये) चतुर्थ क्रमांक विजेत्या देवनगर संघाला श्री.रमेश दलाई(सुरजागड एल टी व्ही) यांच्या तर्फे देण्यात आले.

 

 

यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमात श्री.रमेश दलाई सर (सुरजागड एल टी व्ही) तपन मलिक (उपसरपंच),वडेट्टीवार साहेब (वनपाल),दिनबंदू पाल,समीर बैरागी,रबीन मिस्त्री,सुब्रतो रॉय,अभिलाष सरकार,किशोर मल्लिक तसेच परिसरातील फुटबॉल खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!