Home Breaking News   धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे शालेय साहित्य वाटप संपन्न.

  धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे शालेय साहित्य वाटप संपन्न.

151

 

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे शालेय साहित्य वाटप संपन्न.

 

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी निवासी अपंग विद्यालय, लांझेडा, गडचिरोली येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.

गरजूंना मदत हे लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमासाठी श्री हर्षे सर आणि श्री देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या सौ. प्रगती मामीडवार आणि सौ. कांता वाघ यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमाचा लाभ १७ गरजू मुलांनी घेतला.

Don`t copy text!