*केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळवुन द्या.*

90

*केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळवुन द्या.*

 

*भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन*

 

*भाजपा गडचिरोली तालुका व गडचिरोली शहर कार्यकारीणीची बैठक संपन्न*

 

*गडचिरोली:-दि.१२ ऑगष्ठ*

 

*विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन करायचे असेल तर केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून द्या.तसेच पंचायत समिती गण,नगर पंचायत,नगरपरिषद, ग्रामपंचायत येथे प्रभागनिहाय बैठका घ्या. शक्तीकेंद्रप्रमुख,बुथ प्रमुख यांनी प्रत्यक्ष बुथवर जावुन बैठकांच्या माध्यमातून घरोघरी जावुन मतदार संपर्क अभियान राबवा.असे आवाहन जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*

*भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली तालुका व शहराची कार्यकारीणी बैठक आरमोरी रोडवरील गानली सभागृह येथे संपन्न झाली.यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होते.*

*यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विकासकामावर व राजकीय विषयांवर चर्चा केली व बैठकीला मार्गदर्शन केले.*

*यावेळी बैठकीला जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर यांनी मार्गदर्शन केले.*

*याप्रसंगी मंचावर जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,डॉ.नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर,माजी उपसभापती विलास दशमुखे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, नरेश हजारे,विवेक बैस,प्रा.अरुण उराडे, तालुका महामंत्री,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,शक्तिकेंद्रप्रमुख व बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.*