१५ ऑगस्ट च्या तिरंगा बाईक रॅलीत सहभागी व्हा,आमदार डॉ. देवराव होळी

169

१५ ऑगस्ट च्या तिरंगा बाईक रॅलीत सहभागी व्हा,आमदार डॉ. देवराव होळी

 

वृत्तवाणी न्युज, गडचिरोली (दि,१४ ऑगष्ट)

 

१५ ऑगस्टला सकाळी १०:३० वाजता आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ

 

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा महोत्सव सुरू असून त्याच प्रेरणेने गडचिरोली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हि तिरंगा रॅली आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात येणार आहे. या रॅलीला तिरंगा प्रेमी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

 

रॅलीचा मार्ग असा राहील

¶¶¶¶

रॅली एकत्रीकरण व शुभारंभ आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली – इंदिरा गांधी चौक यू टर्न – धानोरा रोड – शिवाजी महाविद्यालय – संघ कार्यालय – रेड्डी गोडाऊन – चामोर्शी रोड – सायन्स कॉलेज गोकुळनगर बायपास रोड – आयटीआय चौक – कारगिल चौक – इंदिरा गांधी चौक त्यानंतर आमदार जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.