आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या महिलेचे पोलीसांनी वाचवले प्राण

55

 

आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या महिलेचे पोलीसांनी वाचवले प्राण

 

 

सविस्तर वृत्त असे आहे की, दि. 22/08/2024 रोजी दुपारी भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठडयावरुन भामरागड मधील एका महिलेने नदीत उडीमारत आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, त्यामुळे तेथील नागरिकांनी तात्काळ जलद प्रतिसाद पथक, भामरागड (क्युआरटी) च्या जवानांशी संपर्क केला. अशावेळी वेळेची दिरंगाई न करता उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली क्युआरटी भामरागडच्या जवानांची एक छोटी तुकडी तात्काळ त्याठिकाणी मदतीस पोहचली व सदर महिलेस वाहत्या पाण्यातुन बाहेर काढले, महिला घाबरलेल्या व अस्वस्थ परिस्थिीतीत होती त्यामुळे क्युआरटीच्या जवानांनी त्वरीत ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे संपर्क करुन रुग्णवाहिका बोलावून सदर महिलेस उपचाराकरीता रुग्णालयात भरती केले.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात नापोअं/योगंेद्र सेडमेक, पोअं/संपत गंड्राकोटा, पोअं/शंकर हबका व पोअं/सुरेश कुडयेटी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व कायदा व सुव्यवस्था राखणे याच बरोबर समाजाशी आपुलकीचे नाते जपत पोलीसांनी दाखविलेल्या या साहसी कार्याचे कौतुक भामरागड येथील नागरीकांनी केले.