Home Breaking News महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

78

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

………………..

गडचिरोली

दिनांक – २१/०८/ २०२४

 

प्रति,

मा. मुख्य वार्ताहर

…….. गडचिरोली

 

कृपया प्रसिद्धी करिता

महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा, फुले वार्ड ,गडचिरोली येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय तर्फे वैद्यकीय तपासणी

 

गडचिरोली दि. २१ ऑगस्ट २०२४

गडचिरोली येथील महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा, फुले वार्ड,गडचिरोली येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासाच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.यावेळी विदयार्थ्यांची सिकलसेल, सी. बी सी. तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीचा लाभ २० विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी महात्मा गांधी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा साळवे(धात्रक) तसेच शिक्षक श्री गेडाम सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे विविध समाजोपयोगी व विविध समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे ,ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यासाच्या वतीने सौ. प्रगती मामीडवार या सहभागी झाल्या होत्या . जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सिकलसेल च्या काॅन्सिलर सौ. नीता बालपांडे, तपासणी करणारे श्री स्वप्नील चापले सर आणि चंमु, तसेच सी बी सी तपासणी करणारे एच एल एल चे श्री कुंदन गोन्नाडे आणि त्यांची चमु यांनी हा वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम घेतला.

आपली नम्र

सौ. प्रगती मामीडवार

९६५७९९१०८७

Don`t copy text!