Home Breaking News महावितरण संवसु मंडळ मध्ये शिकाऊ स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी या महाराष्ट्र नवनिर्माण...

महावितरण संवसु मंडळ मध्ये शिकाऊ स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश !!!

111

महावितरण संवसु मंडळ मध्ये शिकाऊ स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश !!!

 

महावितरण संवसु मंडळ गडचिरोली/ आलापल्ली/ ब्रह्मपुरी विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष (२०२४-२५) या कालावधी करिता वीजतंत्री/ तारतंत्री/ व कोपा व्यवसायातील शिकावू उमेदवारांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत स्थानिक विभागातील उमेदवारांची निवड आय.टी.आय(ITI) गुणांकाच्या तत्त्वावर व पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी व स्थानिक उमेदवारांना डावलून दुसऱ्या विभागातील उमेदवारांची निवड करण्यात येऊ नये,अशी निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली यांच्या कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सचिव डॉ.राजेंद्र गडपल्लीवार,जिल्हा विध्यार्थी सेना उपाध्यक्ष इंजि.अंकुश संतोषवार व महाराष्ट्र सैनिकांनी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे या मध्ये स्थानिक विभागातील उमेदवाराला संधी मिळालेली आहे निवड झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त केले आहे.

Don`t copy text!