Home Breaking News *कोठी येथील ब्रेन मलेरिया ग्रस्त महिलेस अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव...

*कोठी येथील ब्रेन मलेरिया ग्रस्त महिलेस अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची आर्थिक मदत*

75

*कोठी येथील ब्रेन मलेरिया ग्रस्त महिलेस अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची आर्थिक मदत*

 

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठी येथील रहिवासी अतिदुर्गम भागातील ब्रेन मलेरिया ग्रस्त मुलगी ममता शोबु गोटा राहणार कोठी तालुका भामरागड या मुलीला नुकताच ब्रेन मलेरिया ग्रस्त असल्याने अहेरी ग्रामीण रुग्णालय येथून चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते पण तिच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही.सदर महिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ड क्रमांक तीन बेड नंबर 37 येथे भरती आहे, आवश्यक माहिती अभावी व योग्य उपचार अभावी सदर महिला चे आप्तेष्ट बऱ्याच ठिकाणी फिरत होते ? त्यांचे कुटुंब सध्या खूप आर्थिक विवंचनेत होते, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांना ही बातमी कळताच त्यांनी आपल्या दानशूर पणाचा परिचय देऊन या विषयाची दखल घेतली व आवश्यक उपचाराचा खर्च देण्याचे कळविले व त्यांचे आप्तेष्ट यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधला व यानंतर पुन्हा काही मदत लागल्यास आपण सर्वतोपरी मदत करू व आमचे लक्ष नक्कीच या भगिनीकडे नक्कीच राहील असे आश्वासन दिले याबद्दल राज्याचे राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे रुग्ण महिलेचे आप्तेष्ट यांनी व अहेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आभार मानले.

Don`t copy text!