Home Breaking News अधिकृत होर्डिंग बळजबरीने काढले…काढतांना केला घरगुती गॅस सिलेंडर चा वापर….लाडकी बहीण योजनेचे...

अधिकृत होर्डिंग बळजबरीने काढले…काढतांना केला घरगुती गॅस सिलेंडर चा वापर….लाडकी बहीण योजनेचे बॅनर सुध्दा फाडले..

73

अधिकृत होर्डिंग बळजबरीने काढले…काढतांना केला घरगुती गॅस सिलेंडर चा वापर….लाडकी बहीण योजनेचे बॅनर सुध्दा फाडले..

 

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात लावलेल्या अधिकृत होर्डींग ची परवानगी घेत तसेच होर्डींग चे स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र देण्यात आल्या नंतर सुध्दा आज जिल्हा परिषद प्रशासन उपविभाग बांधकाम विभागाच्या वतीने घरगुती गॅस सिलेंडर चे वापर करून चार होर्डिंग्ज बळजबरीने काढून टाकले.

या कारवाई करते वेळी जिल्हा परिषद च्या मुख्य अधिकारी आयुशी सिंग व उप मुख्य अधिकारी रवींद्र भुयार हे घटनास्थळी न येताच फक्त आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना मोबाईल वर कुठल्याही परिस्थितीत ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश करीत होते.

ही कारवाई करतांना होर्डिंग चे लहान लहान तुकडे करून टाकल्याने चारही होर्डींग मालकांचे प्रत्येकी पाच लाख प्रमाणे जवळ पास वीस लाखांचे नुकसान या कारवाई मुळे झाले आहे.

तसेच ही कारवाई करतांना नगर पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर सुध्दा फाडून टाकण्याचे पराक्रम आज जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. होर्डींग बळजबरीने काढणे व त्या करीता घरगुती गॅस सिलेंडर चे वापर करणे चुकीचे असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात येणार असल्याचे तसेच ही कारवाई करण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जमा केलेली अनामत रक्कमही परत न देता,ह्या कारवाई ची होर्डींग मालकांना कोणतीही लिखित स्वरूपात माहिती देण्यात आली नव्हती.

सदर कारवाई च्या विरोधात न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही होर्डिंग मालकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Don`t copy text!