राजोली गावातील नव युवा मंडळाचा कार्यकर्त्यानी हाती पावळा,झाडू घेऊन केला गाव स्वच्छा।
ग्रामपंचायत सदस्य साईनाथ लालाजी गेडाम यांच्या पुढाकाराने राजोली येथे स्वच्छता मोहीम
राजोली येथिल संपूर्ण गाव स्वच्छ करून गावातील नागरिकांना मध्ये स्वच्छते बद्दल केली जनजागृती
निमित्त गावातील युवकांनी आपल गाव स्वच्छ, सुंदर,रोगराईमुक्त व सुसज्ज करू अशी घेतली शपत
दिं 11/10/2024
गडचिरोली: धानोरा तालुक्यातील राजोली गावातील नव युवकांनी आपला गाव स्वच्छ, सुंदर, रोगराई मुक्त,व सुसज्ज असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील नागरिकांनमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी ,यासाठी नव युवकांनी आपल्या गावात स्वच्छता अभियान राबवून गाव केला स्वच्छ
आज विजयादशमीच्या दिवशी गावातील नव युवकांनी स्वच्छतेचा संकल्प हाती घेऊन एक दिवस स्वच्छतेसाठी म्हणून गावातील अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईबद्दल गावातील लोकांमध्ये जनजागृती केली. संपूर्ण गाव आजूबाजूचा परिसरात स्वच्छ करून आपलं गाव स्वच्छ, सुंदर, रोगराईमुक्त व सुसज्ज करू अशी शपथ घेतली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ लालाजी गेडाम,किशोर जेगटे, विश्वनाथ निकेसर ,चंदू,ढोले, सुखदेव गुरनुले, गुरुदेव लेंगुरे उत्तम वाढई, प्रमोद वाडगुरे, कृष्णा वाडगुरे, टीकाराम गावतुर, महेश लेंगुर, टिकाराम गावतूरे,प्रमोद वाटगूरे ,अमन,पंकज हे उपस्थित होते