Home Breaking News *_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात राम मंदिर आष्टी येथे भाजपा पदाधिकाऱ्यासह संघटनात्मक बैठक…._*

*_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात राम मंदिर आष्टी येथे भाजपा पदाधिकाऱ्यासह संघटनात्मक बैठक…._*

80

*_मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात राम मंदिर आष्टी येथे भाजपा पदाधिकाऱ्यासह संघटनात्मक बैठक…._*

दिं.०४ नोव्हेंबर २०२४

आष्टी:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आष्टी येथील राम मंदिरात संघटनात्मक बैठक माजी खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखालील उत्साहात पार पडली.

 

या बैठकीला पक्षाचे भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,माजी जि.प.सदस्य प्रकाशजी कुकुडकर, राजनाथ कुशवा,सुरेश फरकाडे,विजय बोमकंटीवार,पवन रामगीरकर,नरेंद्र हेडावु,विठ्ठल आवारी,विनोद भोयर,सचिन डाहाके,प्रभुदास खोब्रागडे, वतीश चहारे,वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या बैठकीला उपस्थितीतांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी मार्गदर्शनातून आगामी निवडणुकीत प्रचार यंत्रणा मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि प्रचाराचे धोरण आखणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट समोर ठेऊन बैठकीदरम्यान मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर, नियोजन, आणि मतदारांच्या गरजा समजून घेण्यावर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील नेत्यांना अधिक जबाबदाऱ्या देत प्रचारासाठी विशिष्ट विभागांना ठराविक कार्ये सोपविण्यात येईल.

 

बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि जोम वाढला पाहिजे व आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद जी नरोटे यांचा विजय निश्चित करून अधिक प्रोत्साहनाने काम करण्याची भावना या बैठकीला मा.खा.अशोकजी नेते यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले.

Don`t copy text!