सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जखमी व मृत्यू होत असल्याचे विरोधात सामाजिक कार्यकर्ते जीतूभाऊ धात्रक यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे निषेध आंदोलन
सावली : वृत्तवाणी न्युज
काल सीसीएफ जितेंद्र रामगावकर सर सीसीएफ ऑफिस चंद्रपूर येथे सावली तालुक्यात सर्वात जास्त वाघाच्या हल्ल्यात लोक जखमी आणि मृत्यू होत असलेल्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले .
त्येवेळेस जवळपास ६० ते ७० जवळपास दहा गावातील लोक होते . त्यात प्रामुख्याने सगळ्यात सावली तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यू होत आहेत त्यासाठी येथील वाघ लवकरात लवकर स्थलांतर करण्यात करण्यात यावे . त्यांना हद्दपार करण्यात यावे . शासकीय मदत ही लवकरात लवकर मयतांच्या वारसाना जास्त त्रास न होता मिळाली पाहिजे . आणि शासकीय मदत ही पुन्हा जास्त वाढीव मिळाली पाहिजे . त्यांच्या वारसाना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे . आणि यानतर एकही व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात जखमी किंवा मरण पावला नाही पाहिजे . आणि जंगली जनावर (, वाघ डुक्कर , बंदर )यापासून मानवाची आणि शेतकऱ्याने मेहनतीने पिकविलेल्या सर्व पिकांची जानवर पासून सुरक्षा साठी वनविभागाकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी केली आहे . ह्या समाजाच्या हिताच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण येणाऱ्या एक महिन्या पूर्ण कराव्या अन्यथा हजारोच्या संखेने येऊन मोठा आंदोलन करण्यात येईल ..
त्यात सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ धात्रक मेहा बुजरुक ,पूनम भाऊ झाडे , जितू भाऊ मस्के , राजूभाऊ धोटे, दीपकभाऊ दाजगाये, पुरुषोत्तम गेडाम , मुकुंद धुर्वे , धर्माजी दाजगाये , गोविंदा दाजगाये , तुलाराम धुर्वे तसेच इतर १० गावातील ७० लोक सावली तालुक्यातील होते .