Home Breaking News धानोरा तालुक्यातील विविध समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली चर्चा

धानोरा तालुक्यातील विविध समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली चर्चा

108

धानोरा तालुक्यातील विविध समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली चर्चा

 

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून

निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे धानोरा नगरीत आगमन झाले असता, धानोरा तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लाडक्या बहिणीकडून औक्षण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ नरोटे यांनी धानोरा तालुका पदाधिकाऱ्यांसोबत बसून तालुक्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भेट घेऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतले व लवकरात लवकर समस्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण रुग्णालयाचे सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. पंचायत समिती धानोरा येथील गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या.यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते साईनाथ साळवे, भाजपा तालुकध्यक्षा लताताई पुंघाटे, भाजपा शहराध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक साजन गुंडावार, नगरसेवक संजय कुंडू, अनंत साळवे, महादेव गणोरकर, शुभाष घाईत व कार्यकर्ते उपस्थित होते

Don`t copy text!