जनजागृतीमुळे एड्स संसर्गात घट
गडचिरोली,(जिमाका),दि.29: राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जात असल्याने गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत एड्स संसर्गाचे प्रमाणाची टक्केवारी कमी असल्याने सकारात्मक चित्र आहे लवकरच हे प्रमाण शुन्य टक्यापर्यंत आणण्याचा आपले मानस आहे.
एचआयव्ही प्रतिबंध व नियत्रंणासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात त्या अतंर्गत जिल्हा स्तरावरुन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण विभाग जिल्हा रुग्णालय मार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात एचआयव्ही प्रतिबंध व नियत्रंणासाठी वेगवेगळ्या सेवा कार्यरत आहे. सध्या जिल्हयात एचआयव्ही समुदेशन व चाचणी करण्यासाठी एकूण 7 आयसीटीसी केंद्र कार्यरत आहे. त्याचप्रमाणे 3 पीपीपी, 54 एफआयसीटीसी, 1 जेल 1 एआरटी केंद्र व 1 गुप्तरोग केंद्र कार्यरत आहे ज्या ठिकाणी प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहे. या केंद्रामध्ये एचआयव्ही समुपदेशन विशेषत व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडुन आणण्यासाठी प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे जे संर्सगित आढळले आहेत. त्यांना औषधोपचार तसेच मानसिक आधार सामाजिक योजनाचा लाभ दिला जात आहे.
नवीन पिढीमध्ये एचआयव्हीचा संसर्ग जाऊ नये म्हणून ईएमटीसीटी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रक्त संक्रमण विभागाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगीतले.
सन 2024-25 एचआयव्ही समुदेशन व चाचणी 25656 करण्यात आली आहे. त्यापैकी संसर्गीत आढळलेले रुग्ण 53 (0.21%) आहेत गरोदर मातेची एचआयव्ही समुदेशन व चाचणी 13614 करण्यात आली आहे. यापैकी संसर्गीत आढळलेले रूग्ण 02 (0.01%) आहेत. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामन्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000