Home Breaking News अखेर महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर, गृह खाते फडणवीसांकडेच; एकनाथ शिंदेंना नगरविकास...

अखेर महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर, गृह खाते फडणवीसांकडेच; एकनाथ शिंदेंना नगरविकास तर अर्थ अजित पवारांकडे

104

अखेर महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर, गृह खाते फडणवीसांकडेच; एकनाथ शिंदेंना नगरविकास तर अर्थ अजित पवारांकडे

 

 

नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या राज्य सरकारमधील मंत्र्यांचे खाते जाहीर करण्यात आले. नागपुरात सुरु असलेले हिवाळी अधिवेशन शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी ५ वाजता संपले. त्यानंतर काही तासातच खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास खाते मिळाले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे.

 

हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्य मंत्र्यांचा समावेश होता. नितेश राणे, धनंजय मुंडे, संजय राठोड,भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे यांना कोणती मंत्रालयं मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे.

 

कॅबिनेट मंत्री

 

१ – चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

 

२ – राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

 

३ – हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

 

४ – चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

 

५ – गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

 

६ – गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

 

७ – गणेश नाईक – पर्यटन

 

८ – दादाजी भुसे – शालेय शिक्षण

 

९ – संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

 

१० – धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

 

११ – मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

 

१२ – उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

 

१३ – जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

 

१४ पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

 

१५ – अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

 

१६ – अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

 

१७- शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

 

१८ – आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

 

१९ – दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

 

२० – अदिती तटकरे – महिला व बालविकास

 

२१ – शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

 

२२ – माणिकराव कोकाटे – कृषी

 

२३ – जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

 

२४ – नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

 

२५ – संजय सावकारे – कापड

 

२६ – संजय शिरसाट – सामाजिक न्याय

 

२७ – प्रताप सरनाईक – वाहतूक

 

२८ – भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

 

२९ – मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

 

३० – नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

 

३१ – आकाश फुंडकर – कामगार

 

३२ – बाबासाहेब पाटील – सहकार

 

३३ – प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

 

राज्यमंत्री

 

३४ – माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

 

३५ – आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

 

३६ – मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

 

३७ – इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

 

३८ – योगेश कदम -गृहराज्य शहर

 

३९ – पंकज भोयर – गृहनिर्माण

 

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांना खाते वाटप होईल अशी अपेक्षा होती. मात्र अखेर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. अपेक्षेनुसार गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रायलयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस – गृह

 

अजित पवार – अर्थ

 

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

 

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

 

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

 

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

 

गणेश नाईक – वन मंत्री

 

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

 

पंकजा मुंडे – पर्यावरण

 

उदय सामंत – उद्योग

 

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

 

दादा भुसे – शालेय शिक्षण

 

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

 

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

 

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

 

अतुल सावे – ओबीसी

 

अशोक उईके – आदिवासी

 

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

 

दत्तात्रय भरणे – क्रीडा

 

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

Don`t copy text!