*_भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे – मा.खा.अशोकजी नेते_तालुका कार्यशाळेत मार्गदर्शन_*

28

*_भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे – मा.खा.अशोकजी नेते_तालुका कार्यशाळेत मार्गदर्शन_*

 

दिनांक २८ डिसेंबर २०२४

 

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, गडचिरोली तालुका ग्रामीणच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने आज, शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी साई मंदिर हॉल, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे तालुका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून मा.खा. अशोकजी नेते (भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री) यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, “भाजपची सदस्य नोंदणी मोहीम ही देशाच्या राजकीय व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. नव्या सदस्यांना पक्षाच्या विचारसरणीची सखोल माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. गडचिरोली ग्रामीण आणि जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम संघटनात्मक एकतेचे दर्शन घडवणारा ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.

 

सदस्य नोंदणी मोहिमेला अधिक गती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

कार्यशाळेतील प्रमुख मान्यवर भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, विधा. संयोजक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुका प्रभारी भास्कर बुरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुका महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यशाळेने गडचिरोली तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला बळकटी मिळेल आणि सदस्य नोंदणी मोहिमेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.