नवनिर्मित पोमकें पेनगुंडा हद्दीतील माओवाद्यांचे स्मारक गडचिरोली पोलीस दलाने केले उध्वस्त

38

 

नवनिर्मित पोमकें पेनगुंडा हद्दीतील माओवाद्यांचे स्मारक गडचिरोली पोलीस दलाने केले उध्वस्त

 

* पेनगंुडा ते नेलगंुडा रोडवर माओवाद्यांनी उभारले होते स्मारक.

 

माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून दूर आहेत, त्यंाचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 11/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगंुडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

 

आज दिनांक 28/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोमकें पेनगंुडा हद्दीतील पेनगंुडा ते नेलगुंडा रोडवर पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बिडीडीएस, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरु केले असता, पेनगंुडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. बिडीडीएस पथकाने सदर परिसराची कसुन तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उध्वस्त केले.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. श्रेणिक लोढा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोेजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून, माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही व त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करु नये असे आवाहन केले.

 

————।।।————–