*वर्ल्ड सेवन वंडर टॅलेंट रिडियंट* *ट्यालेंट बुक ऑफ रेकॉर्डस् तथा* *ग्यान उदय फाउंडेशन पुणा* *यांच्या वतीने छाया ताई* *कुंभारे नारी शक्ती पुरस्काराने* *सन्मानित* 

31

*वर्ल्ड सेवन वंडर टॅलेंट रिडियंट* *ट्यालेंट बुक ऑफ रेकॉर्डस् तथा* *ग्यान उदय फाउंडेशन पुणा* *यांच्या वतीने छाया ताई* *कुंभारे नारी शक्ती पुरस्काराने* *सन्मानित*

*क्रांतिवीर शहीद भगत सिंग यांचे* *पुतणे सरदार करांजित सिंह* *यांच्या हस्ते पुरस्कार वितरित*

 

*गडचिरोली* ..गेल्या अनेक वर्षांपासून वर्ल्ड सेवन वंडर टॅलेंट तथा रिडियंट बुक ऑफ रेकॉर्डस् तथा उदय फाउंडेशन पूना यांच्या मार्फत दर वर्षी भारत देशातील विविध भागात विविध राज्यात सामाजिक काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर पुरुष महिलांना महासंमेलन आयोजित करून देशात महान काम करणाऱ्या तसेच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरा कडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो .दिनांक २९/१२/२०२४ ला सदर संस्था कडून नागपूर येथे एकोंनिसावा अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन २०२४ आयोजित करण्यात आला त्या संमेलनात गेल्या तीन महिन्या पूर्वी सदर संस्थेने देशातील सर्व राज्यातील महाराष्ट्र .झारखंड राजस्थान . छतीसगड व इतर राज्यात सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांची माहिती घेऊन निवड केली त्यात महाराष्ट्र गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षल भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात न्याय मिळवून देणे.सतत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात अग्रेसर राहणे हे कार्य अग्रस्थानी ठेऊन गडचिरोली येथील सामजिक कार्यकर्ती तथा शिवसेना महिला जिल्हा संघटीका माजी बांधकाम सभापती श्रीमती छाया ताई कुंभारे यांची निवड करण्यात आली.दिनांक २९/१२/२०२४ ला सांस्कृतिक सभागृह मोर भवण जवळ झाशी राणी चौक नागपूर येथे आयोजित केलेल्या प्रतिभा महासंमेलनात क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांचे सख्खे पुतणे सरदार किरणंजितसिंह यांचे हस्ते तथा मिस उत्तराखंड बिंकल शुक्ला मिसेस .डेहराडून अंजली वशिष्ठ डॉ अतुल निकम कल्पना पांडे माजी महापौर नागपूर. डॉ टी.एस.बारणे माजी आपीएस अधिकारी .गृप्रीतसिंह ब्रार विश्व विख्यात प्राकृतिक चिकित्सक मराठीअभिनेत्री वर्षा गायकवाड.ग्यांन उदय फाउंडेशन चे प्रमुख क्रांती महाजन माजी विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या उपस्थित नारी शक्ती पुरस्कार सन्मान पत्र शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले .या

प्रसंगी नारी पुरस्कार प्राप्त छाया ताई कुंभारे यांनी विचार व्यक्त केले की क्रांतिवीर शहीद भगत सिंग कुटुंबातील व्यक्ती कडून आणि विविध मान्यवरांच्या उपस्थित मला पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने मी फार धन्य झाले.आणि इतक्या वर्षा पासून मी सामाजिक कार्य करीत आहे याची दखल वर्ल्ड सेवन वंडर टॅलेंट रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस् तथा ग्यांन उदय फाऊडेशन यांनी घेतले त्या बद्दल त्यांचे आभार मानले उपस्थितअनेक मान्यवरांनी नारी शक्ती प्राप्त छाया ताई कुंभारे याना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजस्थान.उत्तरांखंड छत्तीसगड असे अनेक राज्यातील पुरस्कार करिता निवड झालेले सामाजिक कार्यकर्ते तथा निमंत्रित बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते