*डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला प्रचंड प्रतिसाद*

29

*डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला प्रचंड प्रतिसाद*

 

*नववर्षाच्या शुभ पर्वावर माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा चामोर्शी येथे जनता तक्रार दरबार*

 

*चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे केले निवारण*

 

*दिनांक 2 जानेवारी 2025 चामोर्शी*

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वतीने जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर गुरुवारला चामोर्शी येथे जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. नववर्षाच्या पर्वावर या जनता दरबाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या तक्रारी माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्याकडे मांडल्या. यावेळी आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे निवारण डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.*

 

*यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, लोमेश सातपुते, प्रतीक राठी, शंकर दास,ज्ञानेश्वर, समर तुरे, विलास चरडूके, तुषार बनपूरकर उपस्थित होते.*