*_मा.खा. अशोकजी नेते यांची आरमोरी प्रकाश चषकाला भेट; खेळाडूंना भाजपा सदस्यत्वाचे आवाहन_*

21

*_मा.खा. अशोकजी नेते यांची आरमोरी प्रकाश चषकाला भेट; खेळाडूंना भाजपा सदस्यत्वाचे आवाहन_*

 

दिं. ६ जानेवारी २०२५,

 

आरमोरी: आरमोरी येथे सुरु असलेल्या प्रकाश चषक भव्य टेनिस बॉल रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेला मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि स्वतः मैदानात उतरून क्रिकेटचा आनंद घेतला. त्यांच्या बॅटींगमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला, त्यांनी दोन चौकार मारून आपल्या खेळाविषयीची आवड प्रकट केली.

 

देशभरात सुरु असलेल्या भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाला पाठिंबा देत, मा.खा. अशोकजी नेते यांनी उपस्थित खेळाडूंना संबोधित करत भाजपा सदस्य होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आम्ही भाजपाचे सदस्य झालो आपणही सहभागी होऊन सर्वांनी भाजपाचे सदस्य व्हावे.

 

यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, तालुकाध्यक्ष पंकजभाऊ खरवडे, नगराध्यक्ष पवनभाऊ नारनवरे, शहराध्यक्ष विलास पारधी,राहुल तितीरमारे,अक्षय हेमके,विकास पायदलवार, तसेच पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रकाश चषक स्पर्धेने खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक आणि राजकीय जनजागृतीचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.