*जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप*
गडचिरोली, (जिमाका) दि.07 : महिला व बाल विकास विभागाaतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुलींच्या कला गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगिन विकास होण्याच्या दुष्टीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव क्रिडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन दिनांक ०१ जानेवारी पासून अहिल्यादेवी बालसदन घोट ता, चामोशी जि. गडचिरोली येथे करण्यात आले होते. त्याचा ०३ जानेवारी ला समारोप करण्यात आला.
सदर बाल महोत्सवात जिल्हयातील अहिल्यादेवी वालसदन घोट व मातोश्री रमाबाई मुलीचे बालगृह व निरिक्षणगृह गडचिरोली येथील प्रवेशित चालिका तसेच, स्थानिक शाळामधील पी.एम.श्री. जवाहर नवोदय विदयालय घोट, नवोदय मराठी उच्च प्राथमिक हॉयस्कूल घोट, परमपूज्य महात्मा गांधी विदयालय घोट, जि. प. महात्मा गांधी हॉयस्कुल घोट, येथील मुली व तालुकास्तरावर क्रांती ज्योती सावित्रीबाई बालसंगोपन योजनावर कार्य करणाऱ्या संस्था सुरक्षा बहुउददेशिय संस्था सिरोंचा, आरोग्य प्रबोधनी संस्था वडसा, पदमावती बहुउददेशिय ग्रामीण विकास संस्था गडचिरोली, आंयकान बहुउददेशिय संस्था गडचिराला, क्रातिज्योती सावित्राबाई फुल बालसंगोपन केंद्र कोरची, आदिवासी विकास संस्था वडसा, आदिवासी विकास शिक्षण संस्था मुलचेरा मधील काळजी व संरक्षाची गरज असणारी वालके यांचा सहभाग करुन त्याच्यासाठी कब्बडी स्पर्धा, १०० मीटर धावने, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, मडका फोड, लिंबु चमचा, सामान्य ज्ञान, एकल नृत्य, सामुहिक नृत्य, एकल गायन, सामुहिक गायन, इत्यादी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये एकूण २७० स्पर्धक सहभाग होवून आपल्यामधील कला गुणांना वाव देवून आनंद व्दिगुणीत करण्यात आला.अहिल्यादेवी बाल सदन घोट येथील बालीकांनी ११ पदके, पी.एम.श्री. जवाहर नवोदय विदयालय येथील बालिकांनी १० पदके, परमपुज्य महात्मा गांधी विदयालय येथील बालिकांनी ४ पदके, जि. प. महात्मा गांधी हाँयस्कुल येथील बालिकांनी ४ पदके, नवोदय मराठी हाँयस्कुल येथील वालिकानी ३ पदके, आरोग्य प्रबोधनी संस्था वडसा येथील बालिकांनी ३ पदके, पदमावती बहुउददेशिय ग्रामीण विकास संस्था गडचिरोली येथील बालिकांनी २ पदके, सुरक्षा बहुउददेशिय संस्था सिरोचा व ऑयकान बहुउददेशिय संस्था गडचिरोली व क्रातिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र कोरची, व आदिवासी विकास संस्था वडसा, येथिल बालीकानी प्रत्येक एक पदके मिळवली. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मोहनिश शेजवळकर तहसिलदार (संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली) प्रमुख अतिथी राजन गजभिये प्राचार्य केंद्रीय नवोदय विदयालय घोट, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्रीमती वर्षा मनवर, सदस्य दिनेश बोरकुटे, डॉ. काशीनाथ देवगडे, ग्रामपंचाय घोट येथील सरपंच श्रीमती रुपाली दुधबावरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली प्रकाश भांदककर, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर, लोककल्याण बहुउददेशिय शिक्षण संस्थेचे पुरुपोषत्तम चौधरी, लोकमंगल संस्थेचे सचिव मर्लीन मॅडम, सामाजिक कार्यकर्त्य रुपा शहा घोट, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, सारीका वंजारी विधी सल्लागार अधिकारी, रुपाली काळे संरक्षण अधिकारी, शासकीय निरिक्षणगृह व बालगृह अधिक्षक महेश रनदिवे, अनुप माझी, किर्तोणीया सर, काजल बिश्वास उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी तसेच चाईल्ड लॉइन कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले
0000