अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु)बैठक
एटापल्ली मंगेर येथे संपन्न
एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची सिटु ची बैठक एटापल्ली तालुक्यातील मंगेर येथे दिनांक 7 जानेवारी ला युनियनचे जिल्हा संघटक कॉम्रेड.अमोल मारकवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या मिटिंगमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कर्मचार्याचा दर्जा देण्यात यावे, पेन्शन व गैज्युटी देण्यात यांवी, अंगणवाडी केंद्रात विद्युत मिंटर देण्यात यावे, अमृत आहार योजना चा लाभ देण्यात यावे गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावे या विषयावर चर्चा करण्यात आली.
या मीटिंग मध्ये कॉम्रेड.अमोल मारकवार, छाया कागदेलवार, राजेश्री लेखामी, सुनंदा बावणे, मनिषा पडालवार,शोभा बत्तुलवार, करुणा दुर्वे, वैशाली दुर्गे,भारती सिडाम, अर्चना अमोल मारकवार,जयश्री वाळके,
लिलिगेश केरकेटा,मोनी विश्वास, बबिता मडावी,नसुरा होयामी,सुपरना सरकार,बिनापाणी मंडल, मनिषा येनगंटीवार,प्रेमिला झाडे सेविका व मदतनीस मीटिंग मध्ये उपस्थित होते.