*मा.खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साहपूर्ण साजरा*
गडचिरोली : शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांच्या जयघोषाने वातावरण देशभक्तिमय झाले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विष्णूमूर्ती दुर्गम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष तथा ता.महामंत्री श्री. बंडूजी झाडे, प्राध्यापक मोहूले सर, वाटेकर सर, जाडी सर, विश्वास सर तसेच प्राध्यापिका मनीषा रोहनकर मॅडम, पिंपळसेट्टीवार मॅडम, गडपायले मॅडम, मानकर मॅडम, चापले मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शवली. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी शेट्टे, रोहनकर, हावलादार, नान्होरीकर, संतोषवार, व कांबळे यांनी कार्यक्रमाची यशस्वीता वाढवली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. राष्ट्रीय एकात्मता व देशसेवेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपल्या कला-सादरीकरणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्सवाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.






