अपार आयडी जनरेट आढावा मुख्याध्यापक सभा कसनसुर येथे संपन्न

35

अपार आयडी जनरेट आढावा मुख्याध्यापक सभा कसनसुर येथे संपन्न

एटापल्ली :

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसनसुर पंचायत समिती एटापल्ली येथे मुख्याध्यापक सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री कोवे सर गटसमनव्यक पंचायत समिती एटापल्ली हे होते.तर प्रमूख अतिथी केंद्रप्रमुख अविनाश बारसागडे, उच्चश्रेनी मुख्याध्यापक श्री कावरे सर, भावी केंद्रप्रमुख शिरीष ऐरावार हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा उंदीरवाडे यांनी केले.

सभेमध्ये अपार आयडी जनरेट आढावा घेऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.युडायस प्लस व सरल आधार आढावा,उपस्थिती वेतन बद्दल प्रमाणपत्र,शालेय पोषणाहार,स्काऊट गणवेश आढावा, एमडीम बेब फार्म बद्दल आढावा,विविध लिंक भरण्याबाबत आढावा,नवभारत साक्षरता आढावा,परीक्षा पे चर्चा लिंक भरणे,हर घर संविधान उपक्रम राबविणे,शिष्यवृत्ती परीक्षा,इन्कमटेक्स फार्म, याशिवाय इतर महत्वाच्या शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी कसनसुर केंद्राचे मुख्याध्यापक उपस्थित होते.