तालुका -एटापल्ली येथे E-CONTENT माडीया बोलिभाषा कार्यशाला स़ंपन्न
प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तसेच गट शिक्षणाधिकारी गट साधन केंद्र एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बांगला,माडीया व गोंडी भाषीक विद्यार्थ्यांच्या शैक्षाणिक गुणवत्ता विकासाकरीता programme Activity अंतर्गत इयत्ता 1 ते 4 वर्गासाठी तज्ञ माडीया शिक्षकांकडून तालुक्यातील इतर मराठी भाषिक शिक्षकांची दिनांक 5/2/2025 ला एक दिवसीय तालुका स्तरीय बोलिभाषा कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांनी केले .त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बोलिभाषेकडून प्रमाण भाषेकडे आणण्याकरिता शिक्षकांनी प्रशिक्षणाची कार्यवाही शाळास्तरावर करावी असे आवाहन केले. श्री. पुरकलवार शिक्षण विस्तार अधिकारी एटापल्ली, श्रीमती बर्लावार केंद्र प्रमुख एटापल्ली, उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री.श्रीहास सोयाम,प्राथमिक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा मर्हमालेंगा, (भामरागड)श्री.एन.आय.तुमरेटी प्राय.शिक्षक जि.प.प्राय.शाळा गेर्रा (भामरागड) श्री.एस.एस.शेडमाके जि.प.प्राय.शाळा जिजगाव (तालुका -भामरागड) श्री.बी.आर.गावडे जि.प.प्राथ.शाळा कोसफुंडी (तालुका -भामरागड) श्री.व्ही.के.वेलादी जि.प.प्राथ.शाळा पंदेवाही टोला (तालुका -एटापल्ली) यांनी माडीया बोलिभाषा कार्यशाळेला उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता श्रीमती झाडे विषय साधनव्यक्ती यांनी उत्तम नियोजन केले. शेवटी प्रशिक्षणार्थ्यांना वाचन पाठसंच व माडीया शब्दकोश वितरण करण्यात आले.
वंदे मातरंम ! घेवून कार्यशाळेचे सांगता करण्यात आली.