*स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*
*अहेरी:* *आलापल्ली येथील स्व. मल्लाजी आत्राम बहुद्देशीय संस्थाद्वारा संचालित स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे तीन दिवसीय क्रीडा संम्मेलनाचे उद्घाटन नुकतेच पार पाडले. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना आपल्या परिसरातील मुली क्रीडा कलागुणांनी निपुण आहेत. खेळातून एकाग्रता निर्माण होते. खेळासोबतच शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थिनींनी उच्च ध्येय गाठावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उन्नती करण्यातच खरे कौशल आहे.प्राध्यापकांनी शिकवण्यासोबतच उज्वल भविष्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.*
*या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य प्रा. अमित कोहपरे हे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य विजय कुसनाके हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा. कैलास चापले तर आभार प्रा. प्रेमानंद खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालक प्रा. अजय बारसागडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.*