Home Breaking News *खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट*

*खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट*

75

*खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट*

 

*लोकसभा क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना घेऊन चर्चा*

 

गडचिरोली :: गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी  केंद्रीय सडक परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली व गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.

दरम्यान  खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची ते बोटेकसा, छत्तीसगड सिमेपर्यंत 18 कि. मी. राज्य महामार्ग क्र. 314, व चामोर्शी ते मुल एकूण 28 कि. मी. राज्य महामार्ग क्र. 378 चे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नत करण्याबाबत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.

तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगांव ते सालेकसा या राज्य महामार्ग क्र. 335 साखळी क्र. 238/205 बाघनदी वरील कमकुवत पुलाचे ठिकाणी सी. आर. एफ. निधी अंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम करने, गडचिरोली ते आरमोरी, आस्टी -आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देऊन तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी केली. दरम्यान मंत्री महोदयानी सकारात्मक प्रतिसाद देऊन लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Don`t copy text!