*जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु*

30

*जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु*

गडचिरोली,(जिमाका),दि.07: गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील दिनांक 06फेब्रुवारी 2025 रोजी शेतशिवारामध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी (चातगांव) व आरआरटी टिम यांना वाघ जखमी अवस्थेत आढळला.

सदर घटनेची तात्क्ळ वरीष्ठ कार्यालयास सुचना देण्यांत आली. व वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार रात्रभर वाघावार निगरानी ठेवण्यांत आली. एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास उपचाराकरीता दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेरबंद करण्यांत आले व उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यांत आले. वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर अहवाल समोर येईल. सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व त्यांचे कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक गडचिरोली शैलेश मिना व अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) चातगांव व आरआरटी टिम, नवेगांव नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत कार्यवाही पार पडली, असे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी कळविले आहे.

0000