Home Breaking News भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

87

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली,(जिमाका),दि.10:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगर व्यावसायीक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचीत करण्यात येते की, सन 2022-23, 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपुर प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज ज्या महाविद्यालयानी अद्याप पर्यंत या कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर केलेले नाहीत, त्यांना अर्ज फॉरवर्ड करण्याची अंतिम दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ही आहे. महाविद्याल यांचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहीत वेळेत अर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली ना काढल्यास तसे अर्ज प्रणालीतुन कायमस्वरुपी रददबातल (Auto Reject ) होतील याची सर्वांनी दखल घ्यावी. महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!