कोटगल गावाच्या विकासासाठी सर्दैव प्रयत्नशील माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

64

कोटगल गावाच्या विकासासाठी सर्दैव प्रयत्नशील

 

माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

 

गडचिरोली दि. 13 फेब्रुवारी 2025

 

शेषसाई नवनिर्मीत नाट्य कला मंडळ कोटगल यांच्या सौजन्याने मौजा कोटगल येथे श्री. गुरूदेव रंगभुमी वडसा प्रस्तुत ‘जळते मी अंतरी” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकाचे उद्घाटन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

प्रमुख अतिथी म्हणून कोटगलच्या सरपंच ममता मनोहर दुधबावरे, उपसरपंच तेजप्रभा पंकज भोयर, डॉ. चेतन गोरे, डॉ. बोदेले, सतिश चिचघरे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शंखदरबार, अभिजित कोरडे, डॉ. दिप्ती कोरडे, मोहन ठाकरे, पारडीचे सरपंच संजय निखारे, वनपरिक्षेत्राधिकारी डी. आर. कोरेवार, कोटगलचे ग्रामसेवक मारगाये, सुदर्शन मोहुर्ले, वनपाल भगवान नागोसे पं.स. चे माजी सभापती मारोतराव इचोडकर, विलास पाटील भांडेकर उपस्थित होते.

 

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, झाडीपट्टी रंगभुमी जिवंत ठेवण्याचे काम नाट्य कलावंत करित आहेत. अशा प्रकारच्या नाटकांचे आयोजन नियमित होत असल्याने आपल्या जिल्ह्यात अनेक नवनवीन कलावंत निर्माण होत आहेत. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गावागावांमध्ये नियमित नाट्य प्रयोगाचे आयोजन करणे आवश्यक आहे. कोटगल गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असुन खासदार, आमदार निधीतुन अनेक विकास कामे केलेली आहेत. यापुढेही गावाच्या विकासासाठी आम्ही मागे हटणार नाही, अशी ग्वाही यावेळी माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी दिली. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थित प्रेक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

नाटकाच्या यशस्वी आयोजनासाठी शेषसाई नवनिर्मीत नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष देविदास भोयर, सचिव जगदिश चौधरी, पवन गेडाम, उपाध्यक्ष पितांबर जुमनाके, दिपक ठाकरे, सहसचिव लिलाधर ठाकरे, जिवन लाकडे, संदिप करकाडे, राजु मेश्राम, किरण मानकर, विनोद मेश्राम, मोंटी राजु ठाकरे, दुर्वेश भुरसे, बाळु दुर्गे, दिलीप भुरसे, अविनाश ठाकरे, नरेंद्र ठाकरे, मारोती नस्कुलवार, हंसराज गोरडवार, राहुल मेश्राम, अरविंद ठाकरे, मिननाथ भुरसे, ढिवरू दुधबावरे व मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.