नाट्य कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली दि. 13 फेब्रुवारी 2025
जय हनुमान नाट्य कला मंडळ, हनुमान वॉर्ड आठवडी बाजार गडचिरोली यांच्या सौजन्याने काल दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी गडचिरोली येथील कारगील चौक, फिल्टर रोड गव्हारे यांच्या आवारात धनंजय स्मृती रंगभुमी, वडसा प्रस्तुत संगीत “अग्निदिव्य’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होत. नाटकाचे उद्घाटन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सहउद्घाटक म्हणून माजी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे लिपीक सुरेश भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तलाठी सुभाष आळे, जीवन वासेकर, शरद सोनटक्के, दिवाकर म्हशाखेत्री, नितीन जेंगठे, रमेश बोदलकर, संतोष मारगोनवार, मनोज पवार, महेश राऊत, संजय गव्हारे, किशोर काटवे, प्रविण कोहळे, किशोर सोमनकर, विलास नैताम, अमृत जुवारे, धनवान बोबाटे, विनोद काटवे, सुनिल बावणे, अनिल भांडेकर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे म्हणाल्या, झाडीपट्टी रंगभुमी आजही जिवंत आहे. व झाडीपट्टी रंगभुमीच्या माध्यमातुन अनेक नवीन कलावंत उपजत आहेत ही खरोखरच जिल्हा वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या नवजात कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नवीन कलाकारांना संधी मिळाल्यास ते नाटकातच नाहो तर मराठो मालीका व मोठ्या पडद्यावर सुध्दा आपल्या कलेची छाप पाडतील यात तिळमात्रही शंका नाही, असे त्यांनी सांगीतले.
नाटकाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विनोद भांडेकर, उपाध्यक्ष प्रकाश भुरले, सचिव गोलु नैताम, कोषाध्यक्ष तुकाराम पिपरे, कालीदास लटारे, सहसचिव यशवंत पिपरे, अविनाश कुनघाडकर, बालाजी भांडेकर, पिंटु बारसागडे, कुणाल भांडेकर, देविदास भांडेकर, सदाशिव बारसागडे, रविंद्र नैताम, सुरेश नैताम, मनोहर भांडेकर, जनार्धन भांडेकर, गुड्डु गव्हारे, आकाश काटवे व मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.