गाणली समाजातर्फे सी-६० कमांडो शहीद स्वर्गीय माहेशभाऊ नागुलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

54

गाणली समाजातर्फे सी-६० कमांडो शहीद स्वर्गीय माहेशभाऊ नागुलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी भामरागड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली.चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावचे विरपुत्र अमर जवान श्री. महेश कवडुजी नागूलवार हे नक्सलवादयाशी लढताना शहीद झाले. त्यानिमित्ताने गाणली समाज शिक्षण व कल्याण मंडळ, गडचिरोलीच्या वतीने दिनांक 15 फरवरी 2025 ला गाणली समाज सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेला समाजबांधव उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, गाणली समाजाचे माजी अध्यक्ष अशोक चन्नावार, शंकरराव कस्तुरवार, रवि चन्नावार यांनी शहीद महेशभाऊ नागुलवार यांच्याप्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण केले. मंडळाचे सचिव रवि आयतुलवार यांनी शहीद महेश भाऊचा जीवन परिचय करून दिला.त्यांच्या पत्नी, आई व दोन मुली असा आप्त परिवार आहे.त्यातील एक लहान मुलगी चार वर्षाची असून तिला मृत्यू काय असते हेही समजत नाही. त्यादिवशीचा त्यांच्या कुटुंबियांचा आक्रांत मन हेलावून टाकणारा होता.विरशहीद श्री. महेशभाऊच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची सक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून सर्व समाज बांधव व महिला मंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या संकटकाळात आपला समाज त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी आहे. या समाजभूषण विर शहीद जवानाबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. असे बोलुन समाज बांधवांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. शहीदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरणे वालो का यही बाकी निशा होगा. जब तक सुरज चांद रहेगा, महेश भाऊ का नाम रहेगा.अशा घोषणा देऊन महेशभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी खूप मोठया प्रमाणात समाज बांधवांची व महिला मंडळींची उपस्थिती होती.