Home Breaking News *निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यात मैदानी खेळ खेळा* — महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा युवकांना...

*निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यात मैदानी खेळ खेळा* — महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा युवकांना संदेश

79

*निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यात मैदानी खेळ खेळा* — महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा युवकांना संदेश

 

*महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते फराडा येते क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न*

 

गडचिरोली :: नवयुवक क्रीडा मंडळ, फराडा ता. चामोर्शी यांच्या वतीने आयोजित भव्य रबरी बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले.

मोबाईल, टीव्ही, काम्पुटर च्या काळात तरुण युवक मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन खेळ खेळत असल्याने अनेक आरोग्य विषयक व मानसिक आरोग्याच्या समस्या तरुणामध्ये येत आहेत त्यामुळे मानसिक व शारीरिक सुदृढ आरोग्याकरीता तरुणांनी दैनंदिन आयुष्यात काही वेळ मैदानी खेळ खेळा असा संदेश महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तरुनांना दिला.

यावेळी माजी जी.प. उपाध्यक्ष गडचिरोली मनोहर पोरेटी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली राजेश ठाकूर, डॉ. सुरपाम, विनम लाड, नुमचंद्र भिवनकर, गुरुदास चौधरी, विकास चौधरी, तेजस कोंडेकर, रोहित भैसारे, बंडू हुलके, महेश संदोकर, मनोज देहलकर, मनोज भोयर, वैशाली उदिरवाडे, लोमेश मडावी पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी व सर्व खेळाडू उपस्थित होते.

Don`t copy text!