*२१ फेब्रुवारीला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*
गडचिरोली, दि. 18: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि महात्मा गांधी आर्टस, सायन्स्, स्व. नसरुददीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता महात्मा गांधी आर्टस, सायन्स्, आणि स्व. नसरुददीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या सहभागी होणार असून, इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधार कार्ड, आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे संपर्क साधावा.