*_सौ.सोनालीताई आशिष पिपरे हे चामोर्शी नगरपंचायत चे महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड झाल्याने मा.खा.अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन…_*
*सौ. सोनालीताई पिपरे – सक्षम नेतृत्वाचा सन्मान, प्रगतिशील वाटचालीचा अभिमान!*
दिं.२१ फेब्रुवारी २०२५
चामोर्शी नगरपंचायतच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. सोनाली आशिष पिपरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी त्यांचे निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, बंडूभाऊ नैताम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या गौरव सोहळ्यात सौ. सोनाली पिपरे यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा करताना त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल टाकणाऱ्या सौ. सोनाली पिपरे यांच्या कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.