*भामरागड नगर पंचायत सभापती निवळणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचा एकतर्फी विजय*

35

*भामरागड नगर पंचायत सभापती निवळणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचा एकतर्फी विजय*

 

*भामरागड:* नगर पंचायत भामरागड येथे आज दिनांक 21/2/2025  रोजी सभापती पदांसाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एकतरफी विजय मिळवून सर्व विषय समित्या काबीज केल्या.

.   अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष  मा.डॉ.धर्मराव बाबा आत्राम  यांच्या आदेशानुसार   रा. कांग्रेस पार्टीचे तडफदार जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रभाऊ वासेकर यांच्या प्रमूख मार्गदर्शननाखाली  आ.धर्मरावबाबांचे  खंदे कार्यकर्ते श्री. अरुणभाऊ मुक्कावार ह्यांनी सर्व तालुका पदाधिकारी वर्गाला सोबत घेऊन  ठरविलेल्या रणनीतीनुसार  कार्य केले. व निर्विवाद एकतर्फी विजय खेचून आणण्यात यश आले. त्यात बांधकाम सभापती पदी तेजस्विनी मडावी, महिला बालकल्याण सभापती पदी कविता येतमवार व आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून कु. लक्ष्मीताई आत्राम यांची निवळ करण्यात आली.

विशेष म्हणजे जिल्हातील सर्व नगर पंचायतीच्या निवळणुकीवर आमदार धर्मरावबाबा हे स्वतः लक्ष ठेवून होते व त्यांच्या कार्य कुशलतेमुळे व जनतेत असलेले विस्वास व लोकप्रियत्यामुळे जिल्हातील एकूण 10 नगर पंचायतीपैकी 7 नगर पंचायतीच्या विषय समित्यावर विजय मिळवण्यात यश आले.

या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांनी खूप मेहनत घेतली व उत्तम मार्गदर्शन केले, तसेच तालुका अध्यक्ष रमेश मारगोणी, कार्यकारी तालुका अध्यक्ष लालसू दादा आत्राम, बाजार समिती संचालक सैनू आत्राम व दादु सेठ श्री. तपेश भाऊ,नगर सेवक सतीश उईके, दिलीप उईके, नगर सेवक गजानन उईके, साईनाथ कोडापे नगर सेवक, नगर शेवक राकेश महाका, नगर सेविका सचिरेखा आत्राम, नगर सेविका ललिता पुंगाती, सुनीता गावडे,रमेश बोलमपाल्ली, देवा विस्वास, जगदीश कोणकमुटीवार, अनुप मोडक, रोहित बोलमपल्ली या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.