आगग्रस्त कुटुंबास पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत

116

आगग्रस्त कुटुंबास पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत
सावली – तालुक्यातील कवठी येथील गरीब कुटुंब असलेले सुरेश गणपत आभारे यांचे घरात आग लागल्याने कपडे, अन्न धान्य, रोख रक्कम, कागदपत्रे ही साहित्य जळून खाक झाले. ही बाब पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना माहीत झाल्याने प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले व 7500 रुपयांची आर्थिक मदत सुरेश आभारे यांना केली. ही मदत पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, संजय गांधी समिती अध्यक्ष राकेश गडमवार, सरचिटणीस नितीन गोहणे, अनिल मशाखेत्री, कवठीचे सरपंच कांताताई बोरकुटे, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, उपसरपंच सुनील पाल, जीबगावचे उपसरपंच पुरुषोत्तम चुधरी, बाजार समिती संचालक अंकुश वरगांटीवार, अरुण गजपलिवार, ग्रा स सदस्य सुनील कुळमेथे, राकेश घोटेकर यांचे हस्ते वाटप करण्यात आली.