मा. संजयजी फांजे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणीची महत्वपूर्ण बैठक

25

मा. संजयजी फांजे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणीची महत्वपूर्ण बैठक

 

गडचिरोली :-दि. 28/2

*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली ची सक्रिय सदस्य नोंदणीची महत्वपूर्ण बैठक आज दि 28 फेब्रुवारी रोजी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे भाजपचे नागपूर विभाग कार्यालय प्रमुख मा. संजयजी फांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आम. डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके उपस्थित होते.*

या बैठकीत मा. संजयजी फांजे यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भाजप सदस्य नोंदणी व सक्रिय सदस्य याबाबतचा आढावा घेतला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाडीचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री उपस्थित होते.