_*वानेरीत भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार: माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन*_
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
_सिंदेवाही तालुक्यातील वानेरी येथे श्री शिवछञपती क्रिडा मंडळ, वानेरी यांच्या सौजन्याने कबड्डीप्रेमिंसाठी भव्य रणसंग्राम कबड्डीचा वानेरी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून *या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडला.*_
_कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वानेरीच्या सरपंच उषाताई नेवारे उपस्थित होत्या. सहउद्घाटक म्हणून स्वप्नीलभाऊ कावळे माजी नगराध्यक्ष न.प. सिंदेवाही उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून अभिजीत मुपीडवार तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी सिंदेवाही, योगेश कुलसंगे उपसरपंच वानेरी, साधना परचाके ग्रा.पं.सदस्य वानेरी, मंडलवार ग्रा.पं.सदस्य, महादेव खोब्रागडे ग्रा.पं.सदस्य वानेरी, शारदा अगळे पो.पा.वानेरी, दुर्वास मंडलवार ग्रा.पं.सदस्य टेकरी, मेघा कामडी अध्यक्ष तं.मु.स.वानेरी, राहुल अगडे मुख्याध्यापक, प्रा. मेलुडकर, प्रशांत मेश्राम, नागोसे सर, सुरेश झुपुलवार, सागर शेख व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते._
_या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असलेला हा खेळ, या खेळाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ही परंपरा कायमस्वरूपी पुढे चालू ठेवावी. वानेरी मधे कबड्डी स्पर्धा भरवल्याने मनापासून आनंद झाला आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनवणे हा अश्या स्पर्धांचा मुख्य उद्देश असला पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली._
_या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 10 हजार रुपये रोख तर आशिष मुप्पिडवार यांचे कडून आकर्षक चषक आहे. द्वितीय पारितोषिक सिंदेवाही येथील काँग्रेस कार्यकर्ता निक्कुभाऊ भैसारे यांच्याकडून 7 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक बलरामभाऊ छत्रवाणी यांच्याकडून 5 हजार रुपये रोख, चतुर्थ पारितोषिक आशिषभाऊ चिंतलवार यांच्याकडून 3 हजार रुपये रोख देण्यात येईल. सोबतच बेस्ट ऑल राऊंडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट रेडर, कॅप्टन कूल असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत._