Home Breaking News *_रोड ओपनिंग मोहिमेदरम्यान जवानाचा हृदयविकाराने मृत्यू – माजी खासदार अशोकजी नेते यांनी...

*_रोड ओपनिंग मोहिमेदरम्यान जवानाचा हृदयविकाराने मृत्यू – माजी खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांची सांत्वना भेट घेतली_*

120

*_रोड ओपनिंग मोहिमेदरम्यान जवानाचा हृदयविकाराने मृत्यू – माजी खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांची सांत्वना भेट घेतली_*

 

दिं. ०२ मार्च २०२५ | गडचिरोली

 

गडचिरोली – विशेष कृती दल येथे कार्यरत असलेले जवान रवीश मधुमटके (वय ३४ वर्षे) यांचे रोड ओपनिंग मोहिमेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.

*_माजी खासदार अशोकजी नेते यांची सांत्वना भेट:_*

या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी गोकुल नगर, गडचिरोली येथे जवान रवीश मधुमटके यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची सांत्वना केली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी होत सहानुभूतीपूर्वक संवाद साधला.

 

*कर्तव्यनिष्ठ जवानास श्रद्धांजली:*

 

“रवीश मधुमटके यांनी देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. त्यांचे अचानक जाणे संपूर्ण पोलीस दलासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या बलिदानाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी भावना माजी खासदार अशोकजी नेते यांनी भेटी दरम्यान व्यक्त केली.

यावेळी सोबत जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम तसेच कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते

Don`t copy text!