*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ; 5 मार्च रोजी धरणे आंदोलन*
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन *दिनांक 5 मार्च 2025 रोजी, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येते दुपारी 12 ते 3 वाजता* पर्यंत भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने जिल्ह्यातील काँग्रेस नेते, सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.
*धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या*-
1) शासकीय धान खरेदी केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्याना तातडीने धानाचे चुकारे देण्यात यावे.
2) शेतकऱ्यांना सोलरकृषी पंप compulsory न करता त्यांना विद्युत कृषी पंप चा पर्याय देण्यात यावा.
3) वनपट्टे धारकांचे प्रलंबित दावे निकाली काढून वनपटे वितरित करण्यात यावे.
4) गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.
5) जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदाची तातडीने भरती करण्यात यावी
6) घरकुल लाभार्त्याना जागा उपलब्ध नसल्यास शासन स्तरावरून जागा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रापर्टी कार्ड सहित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.
7) रोजगार हमी योजना, घरकुल सारख्या विविध योजनातील थकीत असलेले अनुदान लाभार्थ्याना त्वरित देण्यात यावे.
8) जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याच्यावर आढा घालण्यासाठी व महिलांच्या सुरक्षा साठी कठोर व्यवस्था उभारण्यात यावी.
9) रानटी जनावरांचे हल्ले वाढत असून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, व हल्यातील जखमी व नुकसान ग्रस्ताना ताडीने भरपाई देण्यात यावी.
10) राष्ट्रीय व राज्य महामार्गची तातडिने दुरुस्ती करण्यात यावी.
11) जिल्ह्याला अतीरिक्त नव्या बसेस देण्यात याव्या.
12) राज्याचे मुख्यमंत्री तथाजिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी महिन्यातून किमान 2 दिवस जिल्ह्यासाठी देऊन जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात.
यासह विविध मागण्यांना घेऊन, धरने आंदोलन करण्यात येणार आहे.
*आपला विनीत*
महेंद्र ब्राह्मणवाडे
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली
!! *आयोजक – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी*!!






