*शिवणी येथील असाह्य* *तरुणीवर लैंगीक अत्याचार* *करणाऱ्या नराधमास फाशी द्या*
*शिवसेना जिल्हा संघटीका छाया ताई कुंभारे यांची मागणी*
*गडचिरोली* ..तालुक्यातील शिवणी येथील शारीरिक दृष्ट्या कमजोर असलेली तरुणी शौचास गेली होती .तिच्या एकटे पनाचा फायदा घेऊन छत्तीसगड येथील इसम मजुरी काम करण्यास आला होता त्या इसमाने तरुणीला अमानुष पने मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले .अत्याचार एवढे भयानक होते की तिला नागपूर येथील हॉस्पिटल मध्ये हलवावे लागले .अशा या अमानुष पने मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर मोठा पोलिस गुन्हा दाखल करून नराधमाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा संघटीका माजी बांधकाम सभापती महिला नेत्या छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगताप यांना दिले तसेच पोलिस विभागणी महिलांच्या सुरक्षा करिता कठोर पाऊल उचलावे आणि पीडित असाह्य तरुणीला आर्थिक मदत करावीअशी मागणी करण्यात आली निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटीका तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे नूतन वेलेकर . जोसना राजुरकर. धनश्री पवार .देवयानी मिस्त्री महिला कार्यकर्त्या उपस्थित होते






