Home Breaking News *सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शन*

*सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शन*

87

*सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शन*

गडचिरोली दि. 9: सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन १० मार्च ते १२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना, दिव्यांग आणि वृद्धांसाठी उपलब्ध सहकार्य, तसेच अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती छायाचित्र आणि मल्टीमीडियाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारी योजनांची माहिती घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Don`t copy text!