*महाराष्ट्राच्या समृद्धीला गती देणारा अर्थसंकल्प- मा.खा.डॅा.अशोकजी नेते*
दिं. १० मार्च २०२५
औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, कृषी सुधारणा आणि हरित ऊर्जेसह सर्व क्षेत्रांचा समतोल विकास राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात साधला आहे. उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज उद्योगासाठी 21 हजार 830 कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणे ही या जिल्ह्याला श्रीमंतीकडे नेण्याच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. त्यातून केवळ मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच होणार नाही, तर भौतिक सुविधांच्या बाबतीतही गडचिरोली जिल्हा परिपूर्ण होईल. याशिवाय प्रत्येक तालुक्यात बाजार समित्यांची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या कृषीमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी महत्वाचा आहे. विशेष म्हणजे मी अनेक वेळा ज्या मागणीकडे लक्ष वेधले त्या घरकुलांच्या अनुदानात अखेर 50 हजारांची वाढ करण्याचा निर्णय अर्थमंत्री अजितदादांनी या अर्थसंकल्पात जाहीर केला. त्यामुळे हा केवळ महाराष्ट्राच्या समृद्धीला गती देणारा अर्थसंकल्प नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा ठोस कृती आराखडाच आहे!
– मा.खा.डॉ.अशोक नेते
राष्ट्रीय महामंत्री, भाजप (अनुसूचित जनजाती मोर्चा)






