*डॉ. अशोकजी नेते यांना डॉक्टरेट पदवी बहाल – नागपुरात जल्लोषात स्वागत….*
दिं.११ मार्च २०२५
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल आणि साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्या वतीने सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. गोव्यात एका विशेष समारंभात त्यांना ही प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली.
या ऐतिहासिक सन्मानानंतर नागपुरात त्यांचे आगमनाने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे आणि आयटी सेल प्रमुख रंजितभाऊ आडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी आनंद व्यक्त करत नेते साहेबांच्या यशाचा जल्लोष साजरा केला.






