Home Breaking News अखिल भारतीय गानली समाज, जिल्हा समिती गडचिरोली बैठक संपन्न

अखिल भारतीय गानली समाज, जिल्हा समिती गडचिरोली बैठक संपन्न

208

अखिल भारतीय गानली समाज, जिल्हा समिती गडचिरोली बैठक संपन्न

गडचिरोली :

अखिल भारतीय गानली समाज गडचिरोलीची जिल्हा बैठक गानली समाज भवन गडचिरोली येथे जिल्हा अध्यक्ष नितीन संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

या सभेत अखिल भारतीय स्तरावर समाजाला सशक्त समाज संगटन बनवणे व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच सामाजिक,व आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी आपल्या समाजाचा शासन स्तरावर पाठपुरावा करणे.व क्रियाशील नेतृत्व असावे यासाठी आपल्याकडे असलेल्या सर्वसामान्य पर्याय म्हणजेच माजी विरोधी पक्षनेते ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी.म्हणून सर्वानुमते ठराव घेण्यात आला.व विविध विषयांवर बैठकित चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मंडळाचे सचिव मंगेश गदेवार यांनी केले. बैठकीत जयंत बलमवार,अशोक पोरेड्डीवार,प्रविण चन्नावार ,शंकरराव कस्तुरवार,रवि चन्नावार,कमलाकर वडेट्टीवार,प्रकाश तोडेवार,प्रशांत सावकार पोरेड्डीवार,श्रीनिवास गोडशेलवार,अतुल नागुलवार,बंडूजी वडेट्टीवार,अविनाश वडेट्टीवार,दिलीप शृंगारपवार,

सौ.ममता कोतपल्लीवार,सौ.पपिता चन्नावार,सौ.सुनीता वडेट्टीवार

उपस्थित होते.

Don`t copy text!